Ad will apear here
Next
'बुकगंगा पब्लिकेशन्स' प्रकाशित आणि सुप्रसिद्ध लेखिका मधुवंती सप्रे लिखित 'कवितेचा मर्मबंध'

कवितेचा मर्मबंध


सुप्रसिद्धलेखिका मधुवंती सप्रे यांनी लिहिलेले ‘कवितेचा मर्मबंध’ हे समीक्षात्मक पुस्तक‘बुकगंगा पब्लिकेशन्स’तर्फे आज २४ डिसेंबर २०२१ ला प्रकाशित होत आहे.

 

या पुस्तकातबा. सी. मर्ढेकर,ग. दि. माडगूळकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, इंदिरा संत, मंगेशपाडगावकर, आरती प्रभू, मुक्ताई,बालकवी, बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांवरआस्वादक समीक्षात्मक लेखन केले आहे.

 

कवितेमधे अनेकविषय सामावतात.निसर्ग, देश, समाज,विपन्नावस्था, परकाया प्रवेशातून घेतलेली अनुभूती,मन विषण्ण करणाऱ्या घटना. हे सर्वकाही मराठी कवितेतविस्ताराने आलेलं आहे. मराठीत काही कवींनी कवितेत वेगवेगळे प्रयोगकेले. त्यामुळेही अन्य कवीवर्गाला एक नावीन्याची दिशा मिळत गेली.जातीवृत्त सुनीत, ओवी, दिंडी,अभंग या पारंपरिक चौकटीतून बाहेर पडून मराठी कविता दशदिशांना झेपावली.प्रत्येक कवीची कवितेकडे पाहण्याची धारणा ही त्याच्या अनुभवविश्वावर,सामाजिक परिस्थितीवर आणि मिळालेला अनुभव किती खोल रुजला आहे यावर अवलंबूनअसते. केशवसुतांनी म्हटल्याप्रमाणे दिक्कालातून आरपार पाहण्याचीदृष्टी ज्या कवींना लाभते. त्यांची कविता विलक्षण असते. कवितेत शब्दांचं महत्त्व अनन्यसाधारण असतं. ते शब्दचअर्थ आशयाच्या अनेक छटा, अनेक पदर, अनेकस्तर आपल्या पुढे उलगडतात. हे कवी, वाचकांचेआवडते असल्याने, त्यांच्या कवितेचं केलेलं विश्लेषण वाचकांनाआवडेलच अशी खात्री आहे. या पुस्तकाचे दोन भाग आहेत. पहिल्या भागात प्रेमकविता आणि दुसऱ्या भागात विचार आणि निसर्ग या संबंधीच्याकविता आहेत.

 

बुकगंगा.कॉम वरून कवितेचा मर्मबंधयाचे पुस्तक आणि ई-बुक विकतघेण्यासाठी खाली डीटेल्स दिलेले आहेत-


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZRXDF
Similar Posts
बुकगंगा पब्लिकेशन्स, पुणे प्रकाशित आणि डॉ. माधवी वैद्य लिखित ‘कवी शब्दांचे ईश्वर.. असे साकारले कवी’ या पुस्तकाचे प्रकाशन मुखवटे नसणार्‍या चेहर्‍यांपर्यंत पोहोचणे अवघड : कवी-गीतकार वैभव जोशी यांचे प्रतिपादन... डॉ. माधवी वैद्य लिखित ‘कवी शब्दांचे ईश्वर.. असे साकारले कवी’ या पुस्तकाचे प्रकाशन... हे पुस्तक अभ्यासकांसाठी ऐतिहासिक दस्तावेज : डॉ. पी. डी. पाटील
‘आक्का, मी आणि ....’ म्हणजे इंदिरा संतांना जाणून घेण्यासाठी नवा दस्तऐवज पुणे : कवयित्री इंदिरा संत यांच्या स्नुषा वीणा रवींद्र संत यांनी ३५ वर्षांच्या सहवासात त्यांना उमजलेल्या इंदिराबाईंचे व्यक्तिमत्त्व ‘आक्का, मी आणि...’ या पुस्तकाद्वारे शब्दबद्ध केले आहे. पुण्यात ११ ऑगस्ट रोजी झालेल्या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे आणि ज्येष्ठ
हवा असा थाटमाट असे गूज लिहायाला... चार जानेवारी हा कवयित्री इंदिरा संत यांचा जन्मदिन. प्रसिद्ध कवयित्री, कर्तृत्ववान स्त्री, गृहिणी, आदी भूमिकांतील इंदिरा संत यांचे साधे आणि सखोल व्यक्तिमत्त्व त्यांच्या धाकट्या सूनबाई वीणा संत यांनी ‘आक्का, मी आणि... ’ या पुस्तकामधून उलगडून दाखविले आहे. सासूबाई म्हणून, आजी म्हणून, घरातली मोठी व्यक्ती

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language